मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे १२ एप्रिल ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ वा. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‘ ह्या पवित्र नामाचा नामस्मरण सप्ताहास प्रारंभ होणार आहे.तरी स्वामी भक्तांनी ह्या अनमोल संधीचा लाभ घेऊन आपले जीवन स्वामी नामाने मंगलमय करावे.प्रत्येक दिवशी नामस्मरण जपास बसणाऱ्या भक्तांंस महाप्रसाद मिळणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.