कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून पुणे विभाग शिक्षण मतदार संघातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 5106 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या हस्ते आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार जयंत आसगांकर सरांनी आपल्या विभागाला न्याय देताना अत्यंत पारदर्शक आणि उपयुक्त अशी कामे केली आहेत. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व सिद्ध झाले असल्याची भावना व्यक्त केल्या.
यावेळी व्ही बी पाटील, दादा लाड, एसडी लाड, वाय एल खाडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, शिवाजी बोर्डिंगचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघाचे व्ही.जी. पवार, प्रभाकर हेरवाडे, एस. एच. चव्हाण, जयसिंग पवार, बाबा पाटील, राजाराम वरुटे, के. के. पाटील, दत्तात्रय घोगरे, सविता पाटील, मिलिंद पांगिरकर, दत्ता पाटील, देवेंद्र कांबळे, एन. आर. भोसले, सुरेश संकपाळ, अभिजीत गायकवाड, विजय जाधव, उदय पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.












