अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

आनंददायी शनिवार या अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आनंदी शनिवार या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना हस्ताक्षर लेखनाबाबत प्रशालेचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी मार्गदर्शन केले. हस्ताक्षर लेखनासाठी आवश्यक नमुने फलकावर रेखाटन करून यावेळी दाखविण्यात आले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शिंदे एस.बी. व पवार पी.बी. यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हस्ताक्षर लेखनासाठी एकाग्रता व सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत प्रशालेचे सर्व विद्यार्थी रेखाटन साहित्य घेऊन सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे हस्ताक्षराचे धडे यावेळी गिरवले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, कला शिक्षक मंदार चोरगे, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!