अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हे. के. रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास चे वाटप

संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे, वाहतूक पोलिस कृष्णात पडवळ यांच्या हस्ते पासचे वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा गटागटाने आगार कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचाऱ्यांमार्फत पोहोचविण्यासाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १६ जूनपासून औपचारिक सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी एस.टी.वाहतुक नियंत्रक भागोजी गुरखे, वैभववाडी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस कृष्णात पडवळ, मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीनींना मोफत पास चे वाटप करण्यात आले. मानव विकास योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी एस.टी.वाहतुक नियंत्रक भागोजी गुरखे, वैभववाडी पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस कृष्णात पडवळ, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, लिपिक पी.पी.कोकरे तसेच पी.पी.सावंत, अंकिता रावराणे, राहुल चौगले तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!