आमदार रवींद्र चव्हाणांच्या गळ्यात १ जुलै रोजी पडणार प्रदेशाध्यक्षपदाची माळ

मुंबई (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस उत्सुकता लागून असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी ३० जूनला अर्ज भरणार आहेत. तर १ जुलैला त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे १ जुलैला सकाळी ११ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दिशेने पाऊल टाकत, भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

error: Content is protected !!