फोंडा आउट पोस्ट चा कार्यभार पो. हेड कॉन्स्टेबल शिवगण यांनी स्वीकारला !

पोलीस हेड कॉन्स्टेबल वंजारी यांचा सत्कार पोलीस प्रशासनाला अभिमानास्पद– मारुती जगताप.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पोलीस आऊट पोस्ट फोंडाघाट कार्यालयाचा, हेड कॉन्स्टेबल पदाचा कार्यभार सुभाष श्रीधर शिवगण यांनी स्वीकारला. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांना कोणत्या फोंडाघाट येथील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यापूर्वी त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, ओरस, या ठिकाणी दक्ष पोलीस पदाची जबाबदारी पार पाडली आहे. येथील जनतेला विश्वासात घेऊन, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य भूमिका घेतली जाईल व कार्यरत राहीन. पोलीस हा जनतेचा मित्र आहे अशीच भावना राहील अशी ग्वाही शिवगण यांनी दिली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचवेळी फोंडाघाट आऊट पोस्टचे हेड कॉन्स्टेबल उत्तम वंजारे यांची आचरा येथे बदली झाल्याने, त्यांचे जागी शिवगण यांना नेमणूक देण्यात आली. उत्तम वंजारे यांना निरोप देताना ग्रामस्थां तर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी ग्रामस्थांकडून पोलीस सहकारी याचा होत असलेला गौरव, आमच्या खात्याला अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली. उपस्थित ग्रामस्थ सुरेश टक्के, समीर मांगले, सुंदर पारकर, संतोष टक्के, विजय जामदार, प्रथमेश उरणकर, माधवी दळवी,राजा शिरोडकर, केदार रेवडेकर, संजना कोलते, आप्पा मस्कर यांनी श्रीफळ – शाल – भेटवस्तू देऊन वंजारे यांच्या कार्यकाळातील दक्ष पोलीसाच्या आठवणी सांगताना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या माझ्या सहकार्याला सुद्धा असे सहकार्य करा असे आवाहन वंजारे यांनी व्यक्त करून आभार मानले.

error: Content is protected !!