सध्याचा काळ अडचणीचा असला तरी भविष्यात देशात राज्यात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष असेल ; जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज काँग्रेसचा काळ अडचणीचा असला तरी भविष्यात देशात,राज्यात काँग्रेस हाच पक्ष एक नंबरला असणार आहे. आज सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचे पूर्वीचे दिवस आठवायला लागलेत आणि पुर्वीचे दिवस चांगले होते. असे सर्वसामान्य जनता म्हणत आहे. त्यामुळे काँग्रेसला पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होणार त्यामुळे आपण आपला गाव आणि तालुका सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले. वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली वैभववाडी काँग्रेस कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष शेख बोलत होते. यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा जिल्हा काँग्रेस मार्फत सत्कार करण्यात आला. पक्षाने टाकलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असे यावेळी तालुकाध्यक्ष जाधव यांनी सांगितले.तर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी पक्षा मध्ये एकजूट ठेवून पक्ष संघटनेचे काम करा येणारा पुढील काळ आपलाच आहे असे सांगीतले.
तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.   यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण वरुणकर, आनंद पवार, माजी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, अहमद बोबडे, वसंत नाटेकर, दादा नेवरेकर, अशोक राणे, प्रभाकर इस्वलकर, दिलीप राणे, सिद्धार्थ कांबळे, किशोर जाधव, दस्तगीर नाचरे,रमेश देवरुखकर, मुस्ताफिर पाटणकर,सदानंद कदम,कासीम चोचे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!