कुडाळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी डिगस आयोजीत हळदी कुंकू समारंभ काल दि. 22 जानेवारी, 2023 रोजी डिगस येथे संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून ओरोस मंडल महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर तसेच नेहा सावंत, माजी जि. प. सदस्या रुक्मिणी कांदळगावकर उपस्थित होते. सुमारे 350 महिलांनी हळदी कुंकवाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती घोगळे, प्रणाली पवार, माधुरी मेस्त्री, प्रफुलता सावंत, श्वेता राणे, संगीता परब, ऋषाली कांदळगावकर, अनन्या पवार, रिया डिगसकर, यशश्री सावंत, सुहासीनी कदम, राजश्री चव्हाण, भाग्यश्री पुळसकर, शर्वरी भोगटे, कांचन मोहिते, अनामिका राणे आदिंनी मेहनत घेतली.













