सरपंचपदाचे मानधन जि.प.शाळेला प्रदान

वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांचा स्तुत्य निर्णय

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वायंगणी गावच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी सरपंच पदाच्या आपल्या कार्यकाळातील सरपंच पदाचे मिळणारे सर्व मानधन वायंगणी गावातील जिल्हा परिषद शाळेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अस्मि प्रशांत लाड यांची ऑक्टोबर 2022 मध्ये बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी निवड करण्यात आली. गावाचा विकास हाच एकमेव ध्यास हे व्हिजन असलेल्या आणि निःस्वार्थी वृत्तीने वायंगणी गावच्या विकासासाठी काम करत असलेल्या सरपंच अस्मि लाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या पूर्ण कार्यकाळात सरपंच पदाचे मिळणारे पूर्ण मानधन गावातील जिल्हा परिषद शाळेला साहाय्य निधी म्हणून देण्याचे जाहीर केले आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करत पहिल्या महिन्यापासूनच आजवर मिळत आलेले सर्व मानधन शाळेच्या हितासाठी सुपूर्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!