प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते झाले सुशोभीकरण कामाचे भुमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे चौक श्रीधरराव नाईक पुतळ्या समोरील फ्लायओव्हर ब्रिजखाली मोकळ्या जागेत कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व. खर्चातून सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले असून. या कामाचे भुमिपूजन आज प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.कणकवलीच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून हे सुशोभीकण करण्याचे जाहीर केले असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, सचिन सावंत, राजू राठोड,महेश कोदे, विलास गुडेकर, सुदाम तेली,महेश कोदे तेजस राणे,चंदन पाटील, मधुकर वळंजू,जय शेटये आदी उपस्थित होते.