शाळकरी अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण | आरोपीविरोधात पोक्सो सह बलात्काराचा गुन्हा दाखल

दीपक मानेला 3 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका हायस्कुल मध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल असणारा आरोपी दीपक जोतिराम माने विरोधात पोक्सो आणि बलात्काराचा वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जुलै रोजी दहावीत शिकणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती.पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उल्हास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी आहरण झालेल्या अल्पवयीन मुलीसह दीपक माने याला 10 जुलै रोजी माने याच्या हातखंबा येथील घरातून ताब्यात घेत कणकवली पोलीस ठाण्यात आणले होते. 11 जुलै रोजी सदर अपहरण झालेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अधिक चौकशीनंतर आरोपी दीपक माने विरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तपासी अधिकारी महिला पीएसआय वृषाली बर्गे यांनी आरोपी दीपक माने याला विशेष जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सोमवार 14 जुलै पर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

error: Content is protected !!