तळेरे (प्रतिनिधी) : ११ जुलै रोजी सुप्रसिद्ध गझलकार आणि जेष्ठ कवी, साहित्यिक, पत्रकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त ११ जुलै रोजी संध्याकाळी डॉ. कुलकर्णी यांच्या तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होम समोरील प्रांगणातील मधु कट्टयावरती कै. मधुसूदन नानिवडेकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम कार्यक्रम संवाद परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
जेष्ठ साहित्यिक कै. मधुसुदन नानिवडेकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त ११ जुलै रोजी संध्याकाळी मधु कट्टयावरती त्यांच्या स्मृतीस संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्याच बरोबर त्याची आठवण म्हणून एक गोड रसाळ फळे देणाऱ्या झाडाचे वृक्षारोपण मधु कट्टयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच परिवाराचे सदस्य सदाशिव पांचाळ, संजय खानविलकर, सतीश मदभावे, प्रसाद पाटील आणि नानिवडेकर प्रेमी उपस्थित होते.










