खारेपाटण (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ची विद्यार्थीनी विभा गिरीश धुमाळे या विद्यार्थिनीने ग्रामीण सर्वसाधारण गटामध्ये ७०.०० % गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ८२ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
विभा धुमाळे हिच्या यशाबद्दल जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष प्रियांका गुरव,मंगेश ब्रम्हदंडे ग्रा.प.सदस्य स्थानिक प्राधिकरण समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
तर विभा धुमाळे हिने सातत्याने शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यामुळे तीला हे उज्वल यश मिळाले असून ती शिष्यवृत्ती करीता प्राप्त झाली आहे.तिच्या यशामुळे खारेपाटण केंद्र शाळा नं.१ बरोबरच तिने खारेपाटण गावचे नाव देखील उज्ज्वल केले असल्याचे जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी म्हटले आहे.
जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं १ ची विद्यार्थीनी असलेल्या विभा धुमाळे हिने नुकत्याच झालेल्या केंद्रीय नवोदय परीक्षेत देखील यश मिळविले असून तिची निवड जवाहरलाल नवोदय विद्यालय सांगेली,सावंतवाडी येथे झाली आहे.
तिच्या या संपूर्ण यशात तिला मार्गदर्शन करणारे शाळेतील शिक्षिका समिधा राऊत,आरती जोजेन यांचे देखील तिला मोलाचे योगदान लाभले आहे.खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने नुकताच तिचा शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.














