सावंतांचे खंदे समर्थक भिरवंडे सोसायटी व्हाईस चेअरमन शेखर सावंत, गांधीनगर उपसरपंच आर आर सावंत भाजपात
पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत याना आणखी एक धक्का बसला असून त्यांचे खंदे समर्थक असलेले गांधीनगर ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा भिरवंडे सोसायटी व्हाईस चेअरमन शेखर सावंत यांच्यासह गांधीनगर उपसरपंच आर आर सावंत, सदानंद सावंत, ऋषिकेश सावंत, सुधीर सावंत, सुभाष सावंत, गुरू शेट्ये, सुरेश सावंत, बाळकृष्ण सावंत, प्रवीण सावंत आदींनी आज भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश ओम गणेश बंगल्यावर आज झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री उपस्थित होते.याआधी गांधीनगर सरपंच मंगेश सावंत यांनी सतीश सावंत यांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता. आता उपसरपंच आर आर सावंत, तसेच माजी सरपंच शेखर सावंत यांच्यासह महत्वाच्या कार्यकर्त्यानी भाजपात पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपाची ताकद आणखी वाढली आहे.












