सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांनी केले स्वागत
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सिंधुकन्या पिसेकामते गावची सुकन्या अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी आज मूळगावी पिसेकामते येथे भेट दिली. पिसेकामते गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी पिसेकामते सरपंच प्राजक्ता नितीन मुद्राळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे स्वागत करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पिसेकामते पोलीस पाटील रविंद्र जाधव
ग्रामस्थ ज्ञानेश्वर कदम, अंकूश राणे. नंदेश भोगले, अनिल गावकर, महेश बागवे, अरुण राणे,संजय गुरव,आनंद गुरव,नितेश भोगले,सूहास राणे,निलेश भोगले अंकुश गुरव, किशोर मोहिते आदी उपस्थित होते.













