वायंगणी हायस्कूलचा बांधावरची शाळा उपक्रम संपन्न…!

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी यथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेचा “बांधावरची शाळा” हा उपक्रम शनिवार १२ रोजी वायंगणी तळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण बाबाजी सावंत यांच्या शेतावर संपन्न झाला. प्रशालेतील ६५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. शेतामधील कामाचा विद्यार्थ्यांना अनुभव यावा हा यामागील प्रमुख उद्देश होता. हा उपक्रम यशस्वीतेसाठी विभागप्रमुख दयानंद आडे यांनी विशेष परीश्रम घेतले.‌ यामध्ये प्रत्यक्ष भाताच्या लावणीचे प्रात्यक्षिक वसावे व आडे यांनी करुन दाखविले, तर तरवा कसा काढला जातो याचे प्रात्यक्षिक केतकी बावकर व छाया कुणकवळेकर यांनी करून दाखविले. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. टकले व संस्था चालक यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!