सावंतवाडी घरफोडी, दुचाकी चोरी गुन्हा | आंतरराज्य पारधी टोळीच्या दोघा सराईत चोरट्याना अटक

पोलीस कोठडीत रवानगी

ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथे झालेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावताना सिंधुदुर्ग पोलिसांना आंतरराज्य घरफोडी व चोरी करणा-या पारधी टोळीच्या दोन सराईत म्होरक्याना अटक करण्यात यश आले आहे. कोल्हापूर, सोलापूर सह गोवा, कर्नाटक राज्याला चोरी, घरफोडी प्रकरणी हव्या असलेल्या दोन कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथून अटक करण्यात आले असून या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ दहिकर यांनी, ९ जुलै रोजी १० ते १० जुलै रोजीचे सकाळी ६ वाजण्याच्या मुदतीत सावंतवाडी येथील न्यु खासकीलवाडा येथे अज्ञात आरोपींनी श्रमविहार कॉलनी येथील घरामध्ये अनधिकृत प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल व तेथील दोन मोबाईल चोरी करुन निघुन गेलेले होते. घटनास्थळी दोन पाळ कोयते मिळुन आलेले होते. यावरुन सावंतवाडी पोलीस ठाणेत या घरफोडी आणि चोरी प्रकरणी भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करुन या गुन्हयाचा तपास सांवतवाडी पोलीस ठाणे करीत होते.

error: Content is protected !!