आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशाळेमध्ये “गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल. शिष्याने गुरुला केलेले वंदन हे शिष्याच्या जीवनाला कलाटणी देणारे असते. मुख्याध्यापक डी. जे. टकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास विलास जयराम सावंत माजी विद्यार्थी संघाचे मुख्य प्रवर्तक तथा सहसचिव यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. या सोहळ्यास वायंगणी सरपंच
रुपेश पाटकर, संस्था सचिव वैभव जोशी, संस्था खजिनदार ॲड समृद्धी आसोलकर, माजी सरये सरपंच संजना रेडकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री, हनुमंत प्रभू, पोलिस पाटील सुनिल त्रिंबककर, संस्था सदस्य, पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी-माजी विद्यार्थी संघ मुंबई यांनी शाळेतीलसर्व मुलांना वह्याचे वाटप केले. तसेच होतकर विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्ना पाठ्यपुस्तक संत्र ५ व मुलांच्या ड्रेस साठी ५००० ची मदत करुन उपकृत केले. इ.५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी गुरु बद्दलच्या भावना व्यक्त करून, गुरूंचे ऋण व्यक्त केले. ॲड. समृध्दी आसोलकर, सरपंच रुपेश पाटकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी आपल्या मनोगतातून गुरुचे ऋण व्यक्त केले.
विलास सावंत यांनी मनोगतातून आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, आमचा माजी विद्यार्थी संघ हा प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासा-साठी काम करणारा आहे. आपण फक्त आम्हालाशाळेच्या गरजांची कल्पना दया आम्ही त्या आमच्या परिने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी तर समारोप कुणकवळेकर मॅडम यांनी केले.












