पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूची विद्यार्थीनी स्वरा डोळ हीचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील स्वरा मिलिंद डोळ या विद्यार्थिनीने ७०.६६ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ७३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या उज्वल यशामुळे स्वरा हीला शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून स्वराच्या च्या यशाचे पंचक्रोशी मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

तिच्या या यशामध्ये तिला मार्गदर्शन करणारे खारेपाटण हायस्कूल मधील शिक्षक ठाकूर व अमृते मॅडम यांचे मोलाचे योगदान आहे. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक राऊत व शिक्षक वर्ग यांच्याकडून स्वराचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!