खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रोटरियन संजय सानप यांचेकडून प्रशालेत छत्री बँकेचे अनावरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण आणि ज्युनिअर कॉलेज खारेपाटण चे प्राचार्य तसेच रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन संजय सानप यांच्या संकल्पनेतून खारेपाटण हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि छत्री बँकेचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. खारेपाटणमध्ये नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटण, या संस्थेमार्फत पंचक्रोशीमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन संजय सानप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब खारेपाटणच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, शाळेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, शाळेच्या माजी विद्यार्थी प्रमिला भारती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण हायस्कूलचे प्राचार्य संजय सानप यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व रोटरीच्या माध्यमातून शाळेत निर्माण करण्यात आलेल्या छत्री बँक बाबत आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!