कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी व तायक्वांडो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कलमठ येथील तांबे भवन हॉल येथे तायक्वांडो बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
परीक्षा तायक्वांडो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच भालचंद्र कुळकर्णी ( ब्लॅक बेल्ट 4 दान ) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. जयश्री बांदेकर अविराज खांडेकर कु. साईराज सावंत यांचे यावेळी सहकार्य लाभले.
परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
यलो बेल्ट – आद्या चौगुले , आर्या म्हसकर , शिवांश राणे
ग्रीन बेल्ट – गंधर्व प्रभू , जोहान फर्नांडिस
ग्रीन वन बेल्ट – यज्ञा सुतार , काव्या सावंत , काव्या हर्णे
ब्ल्यु बेल्ट – श्रावण राणे , कियारा राणे
ब्ल्यु वन बेल्ट – साक्षी म्हसकर , प्रणव चव्हाण , कौशिक आबदार , शरयू पाटील , स्वरा चव्हाण , ऋचा चव्हाण , संयुक्ताराजे आबदार
रेड बेल्ट – दिव्येश तेंडुलकर , कार्तिक चव्हाण , दिपश्री तेंडुलकर , संध्या गोधोळकर
रेड वन बेल्ट – दुर्वा पवार , जैत्र पटेल
या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा संघटनेचे श्री. विनायक सापळे श्री. सुधीर राणे श्री. अमित जोशी तसेच सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमीचे नितीन तावडे , ऍड. अक्षय कुळकर्णी , संतोष पवार ,ओंकार सावंत आदींनी अभिनंदन केले आहे.












