मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नितेश राणेंकडून १० लाखांचा मदतनिधी

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, मंत्री नितेश राणे यांनी या दिनाचे औचित्य साधत १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, हार-तुरे, बॅनर किंवा होर्डिंग लावण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत नितेश राणेंनी ही उल्लेखनीय मदत दिली.

error: Content is protected !!