घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

​बांदा (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार २९ जुलै रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यनिमित्त ​सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा व धार्मिक विधी, ​दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल.​रात्री घारपी येथील छत्रपती भजन मंडळ यांच्या वतीने ‘शिव शिव’ या भजनाचा विशेष कार्यक्रम होईल. सर्व स्वामीभक्तांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती विजय गावकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!