१०० टक्के कर्ज वसुलीत चाँद नवभारत विकास सेवा सोसायटी तालुक्यात अव्वल

वैभववाडी (प्रतिनिधी) : चाँद नवभारत विकास सेवा सोसायटी उंबर्डे ही संस्था शंभर टक्के कर्ज वसुलीत अव्वल ठरली आहे. सोसायटीचा कर्ज व्यवहार गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ९२ लाखावर पोचला आहे. तर संस्थेची आर्थिक उलाढाल ही २ कोटी ६० लाखांवर पोहचली आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन उमर रमदुल यांनी दिली. सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने भात पीक, आंबा, काजू पीक कर्ज जिल्हा बाहेरील सदनिका गृह कर्ज, घर दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, वाहन कर्ज, मच्छी खरेदी विक्री असे सर्वसामान्य सभासदांना आवश्यक असलेले विविध प्रकारचे कर्ज योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येतात.

यावर्षी वैभववाडी तालुक्यातील २५ विकास सेवा संस्थांमध्ये बँक स्तरावर चाँद नवभारत विकास सेवा सोसायटी उंबर्डे या सोसायटीने १००% वसुलीत अव्वल ठरल्याने यशाचे सातत्य कायम राखण्यात यश प्राप्त झाले आहे. चाँद नवभारत विकास सेवा सोसायटी उंबर्डे, कोळपे कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांच्या सहकार्यांमुळे संस्थेची प्रगती होत असल्याची माहिती चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांनी दिली. चाँद नवभारत विकास सेवा सोसायटी उंबर्डे चेअरमन उमर रमदुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक सभेत ही माहिती देण्यात आली.

संस्थेचे कामकाज सातत्याने यशाच्या शिखावर पोहोचण्यासाठी व्हाईस चेअरमन रमजान बोबडे, गौस पाटणकर, पांडुरंग काळे, धर्मरक्षित जाधव, अनंत बांदेकर, अलिबा बोथरे, विजय सकपाळ, समीर लांजेकर, जगदीश मोपेरकर, रमजान रमदुल, हमिदा बोबडे, प्रतिमा रमदुल, सेक्रेटरी मन्शीर रमदुल यांनी मेहनत घेतली. तसेच बँक तालुका विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर यांनी संस्था बँक स्तरावर शंभर टक्के वसुली होण्यासाठी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!