राज्यस्तरीय पुरस्कार ठाणे येथे प्रदान ; पुरस्कार एस एस पी एम कॉलेज हरकुळ ला केला समर्पित….
मसुरे (प्रतिनिधी) : मला मिळालेला आजचा हा राष्ट्रीय पुरस्कार माझा एकट्याचा नसून आजवर मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या संपूर्ण परिवाराचा, माझ्या सर्व आजवरच्या गुरुजनांचा आणि मसुरे गावाचा आहे. या तीनही संस्थांचे कार्य महान असून देशाच्या कानाकोपऱ्यातून गुणवंतांना अनोख्या पद्धतीने न्याय देण्याचे कार्य गौरव करणाऱ्या संस्थांनी केले आहे माझा आजचा हा पुरस्कार माझ्यासारख्या गरीब मुलीला इंजिनिअरिंगचे शिक्षण देणाऱ्या कणकवली हरकुळ येथील एस एस पी एम कॉलेजला मी समर्पित करत आहे असे प्रतिपादन डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना वैभवी पेडणेकर यांनी केले.
मसुरे गावची कन्या आणि एस एस पी एम कॉलेज कणकवली हरकुळ या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्स ची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला डांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंध सोशल फाउंडेशन डोंबिवली, समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय कर्तुत्व ज्योतिरमय सदभावना राज्यस्तरीय संमेलन ठाणे येथे 9 एप्रिल रोजी सकाळी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पार पडले. या संमेलन मध्ये वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 देऊन गौरवण्यात आले . यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते माननीय विजय पाटकर, अभिनेत्री माननीय उर्मिला डांगे, डॉक्टर सनी शंकर वालीका अध्यक्ष सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, ऍडव्होकेट सदाशिव काळे (मुंबई हायकोर्ट) अध्यक्ष निवड समितीसदाशिव काळे (मुंबई हायकोर्ट) अध्यक्ष निवड समिती, स्वागत अध्यक्ष प्रा. बी एन खरात,खासदार राजन विचारे, श्री केदार दिघे, नेहा परब, श्वेता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर म्हणाले सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंधा सोशल फाउंडेशन डोंबिवली आणि समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र या नामवंत अशा ट्रस्टचे कार्य अतिशय महान असून या कार्याला मी सलाम करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी निवडक हिरे त्यांनी समाजापुढे आणून त्यांच्या कार्याचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे.
वैभवी पेडणेकर ही मसुरे गावची कन्या असून आतापर्यंत तिला विविध तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच कराटे या क्रीडा प्रकारात तिने जिल्हा, राज्य, आंतरराज्य, स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केली आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये विविध गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शालापयोगी गरजा पूर्ण करणे, अशा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य केले आहे. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला पाच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्य म्हणून दत्तक घेतले आहे. तसेच शालेय क्रीडा प्रकार, कथाकथन स्पर्धा, काव्य स्पर्धा,नाट्य,नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त केला आहे. वैभवी ही उत्कृष्ट महिला दशावतार नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध नृत्यांगना सुद्धा आहे. तिच्या या कार्याची दखल महाराष्ट्र मधील अग्रगण्य आशा सनी चारिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंधा सोशल फाउंडेशन डोंबिवली आणि समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र या नामवंत अशा ट्रस्ट ने घेऊन तिची सन 2023 चा महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान या राज्यस्तरीय पुरस्कारा साठी निवड करून अनोखा गौरव केला . तिच्या या यशाबद्दल मसुरे गावात, आणि एस एस पी एम कणकवली कॉलेज कडून कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक निनाद धुरी, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, मर्डे सरपंच संदीप हडकर, उद्योजक नंदू दादा परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, चित्रपट निर्माते संतोष परब, बाबा परब, उपसरपंच पिंट्या गावकर यांनी अभिनंदन केले आहे. वेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर, आभार डॉक्टर बी एन खरात यांनी मानले.