“आपल्या ओंजळीत राहिलं एवढं आपल्यासाठी पुरेसे आहे. ओंजळ भरुन मातीत जाण्याच्या अगोदर ते इतरांना देता आले पाहिजे.”- जितेंद्र परब, विश्वस्त जीवनआनंद संस्था

जितेंद्र परब यांचा ५० वा वाढदिवस जीवन आनंद संस्थेच्या प्रांगणात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : आईवडिलांच्या संस्कारांनी प्रतिकुल परिस्थितीत पाय रोवून आम्हाला जगायला शिकवले. माझ्या भावाचे निराधार वंचितांसाठीचे कार्य मोठे आहे. संस्थेच्या कामातील सहभागामुळे जीवनातील आनंद आणि समाधान मिळते. माझा भाऊ संदिपच्या कार्यामुळे कौतुक आणि प्रशंसेची काही फुले माझ्याही अंगावर पडतात. जीवन हे आईस्क्रीम सारखे आहे. आपण सर्वांनी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असे भावपूर्ण उदगार जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त जितेंद्र लावण्यवती प्रभाकर परब यांनी संविता आश्रमात त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले.

या कार्यक्रमप्रसंगी जितेंद्र परब यांच्या अभिष्टचिंतन पर मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी दिलेल्या शुभेच्छांची क्लिप दाखविण्यात आली. तर त्यांचे ५० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी बंधु जितेंद्र यांना लिहिलेले एक शुभेच्छा पत्र आणि जीवन आनंद संस्थेच्या वतीने सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी सन्मानपत्र व शुभेच्छा पत्राचे वाचन रामचंद्र अडसुळे आणि श्रीकांत उगवेकर यांनी केले.

या कार्यक्रमात मित्र ऋषिकेश परब, प्रदीप गावडे यांनी जितेंद्र यांच्याबद्दल मनोगताद्वारे अभिष्टचिंतन केले. तर जितेंद्र यांचे वडिल प्रभाकर, आई लावण्यवती, पत्नी श्रीया, बहिणी सुजाता आणि संगिता जेष्ठ बंधू राजेंद्र, संजय, सुनील, नरेश, शिक्षक सौ. व श्री. नरे, श्री. वळंजू, मित्र हडकर उभयते गणेश, डॉ. सुधीर निरगुडकर, सचीन पारकर, संदीप परब, बाळू कानडे, डॉ. गिरीश बोर्डवेकर, सीया गावडे यांसह संस्थेच्याच विश्वस्त अरूणा जगियासी, प्रज्ञा राणे, किसन चौरे यांच्यासह संस्थेचे हितचिंतक शैलेन्द्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संविता आश्रमच्या सर्व टिमसह राज परब, ईलाईट टेक्नोसिसचे रक्षिता पाटील, सुरज मोरे, विश्वस्त रामचंद्र अडसुळे यांनी विशेष मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत उगवेकर, प्रास्ताविक किसन चौरे यांनी तर आभार प्रदर्शन महाबळेश्वर कामत यांनी केले.

error: Content is protected !!