बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्रेडाई कटिबद्ध – प्रफुल्ल तावरे

*क्रेडाई महाराष्ट्र साऊथ वेस्ट झोन ची सभा कुडळात संपन्न ; क्रेडाई सिंधुदुर्ग चे आयोजन*

*कुडाळ (प्रतिनिधी) :* बांधकाम व्यवसायिकांना विविध स्तरांवर काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा सर्व प्रश्नांचे निराकरण CREDAI महाराष्ट्राच्या माध्यमातून निश्चितच केले जाईल, असा विश्वास CREDAI महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे यांनी व्यक्त केला.CREDAI सिंधुदुर्ग यांच्या यजमानपदाखाली CREDAI महाराष्ट्र South West Zone ची चौथी सभा दि. ५ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे उत्साहात पार पडली.कार्यक्रमाचे उद्घाटन CREDAI महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर व जयंत ठक्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य रसिक चौहान, सुरेंद्र भोईटे, दशरथ शेट्ये, शहाजी पाटील, तसेच CREDAI सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अभिजित जैतापकर आणि खजिनदार अनिल साखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.या परिषदेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांतील १६ CREDAI City Associations मधील सुमारे १६० बिल्डर्स व डेव्हलपर्स उपस्थित होते.या सभेचे मुख्य उद्दिष्ट बांधकाम व्यवसायाशी संबंधित नवीन कायदे, नियम, लेखापाल विषयक बदल, विविध शहरांतील स्थानिक अडचणी आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना यांवर चर्चा करून सदस्यांना अद्ययावत मार्गदर्शन करणे हे होते.यावेळी अध्यक्ष प्रफुल तावरे यांनी सांगितले की, प्रत्येक झोनमध्ये अशा बैठका नियमितपणे आयोजित होणे आवश्यक आहे. विविध शहरांमध्ये विमानतळ, कारागृह, नियोजन व इतर स्थानिक प्रश्न आहेत. अशा बैठकीतून हे प्रश्न मांडून त्यावर प्रभावी तोडगा काढता येईल. त्यांनी पुढील CREDAI महाराष्ट्राची General Body Meeting २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती देत सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच Study Tour अंतर्गत पहिली भेट बेंगळुरू तर दुसरी चीन येथे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. प्रास्ताविकात CREDAI सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी संघटनेच्या कार्याचा आणि वाटचालीचा आढावा घेतला तर सचिव अभिजित जैतापकर यांनी आभार मानले केले कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.* अॅड. रोहित इरंडे (पुणे) यांनी “Society & Apartment Act – Compliance, Challenges & Best Practices” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.* सीए शिवराज पाटील यांनी “Choosing the Right Business Structure – LLP, Company की Proprietorship?” या विषयावर व्यवसायासाठी योग्य रचना निवडण्याबाबत माहिती दिली.* सीए मंगेश घाणेकर (ठाणे) यांनी “Corporatization – Enhancing Efficiency & Growth of the Organization” या विषयावर संस्थात्मक व्यवस्थापन, कार्यक्षमता आणि व्यवसायवृद्धीबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

error: Content is protected !!