फार्मर कप स्पर्धेदरम्यान प्रगत शेतकरी गटाचा आदर्शवत उपक्रम
चौके (अमोल गोसावी) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी झालेल्या मालवण तालुक्यातील प्रगत शेतकरी बचत गटाने पारंपारिक समुहशेती चा प्रसार आणि शेतीला कृषि पर्यटनाची जोड देण्याच्या उद्देशाने शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी आगळ्या वेगळ्या अशा भात लावणी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रगत शेतकरी गट काळसे यांच्यामार्फत आयोजित या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष काकासाहेब कुडाळकर, मालवण उप कृषि अधिकारी धनंजय गावडे, धामापूर सरपंच मानसी परब, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, आत्मा अध्यक्ष प्रताप चव्हाण, डॉक्टर शरदचंद्र काळसेकर, माधुरी कुडाळकर, आनंदाश्रय अणावाचे संस्थापक बबन काका परब, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी संतोष गावडे, उद्यान पंडित पुरस्कार विजेते उत्तम फोंडेकर माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, कृषी सेविका स्नेहा खोत, ग्राम विकास अधिकारी शेलटकर, माजी विस्तार अधिकारी विनायक चव्हाण, उद्योजक योगेश राऊळ, प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष मनोज मालवणकर, श्याम मालवणकर, सतीश जुवेकर, संजय गोसावी, सुनिल मालवणकर, लीलाधर नाईक, दिनेश ठाकूर, नारायण मयेकर, लीलाधर नाईक, मंदार मयेकर तसेच गटाचे इतर सर्व सदस्य शेतकरी आणि शंभरहून अधिक भात लावणी इच्छुक शेतकरी तसेच पर्यटक उपस्थित होते.
यावेळी माननीय उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील तसेच इतर मान्यवर सकाळपासून कार्यक्रम संपेपर्यंत भात लावणी महोत्सवास उपस्थिती लावली व भात लावणीही केली तसेच सर्वांनी हा कार्यक्रम खूप सुंदर आणि सातत्याने पुढे व्हावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात काळसे हायस्कूलची 25 मुले शेतीचा आनंद घेण्यासाठी शेतात उतरली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या शिक्षिका सायली मोरे तसेच शिक्षक श्री. देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमाला माझी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर यांनी तसेच आनंदआश्रम चे संस्थापक गोविंद उर्फ बबन काका परब, शेतीनिष्ठ शेतकरी संतोष गावडे, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी उत्तम फोंडेकर, आत्मा मालवण तालुका अध्यक्ष प्रताप चव्हाण, माधुरी कुडाळकर, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील साहेब, उप कृषी अधिकारी मालवण धनंजय गावडे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान या महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेली लकी ड्रॉ होती, कार्यक्रमानंतर लकी ड्रॉ वितरण झाले यामध्ये महिलांना साड्यांचे तसेच भात कापणी वीळे, घमेली ,फळझाडे यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात भात लावणे हा विषय नव्हता तर जे शेती करत नाहीत त्यांना आपल्या मातीला स्पर्श व्हावा व सर्वांना पुन्हा शेतीकडे परावृत्त करणे हा उद्देश होता व मातीचे ऋण फेडावेत असा संदेश होता. त्याचा आनंद अनुभव अगदी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शिक्षकांनी शाळेतील मुलामुलींनी चाकरमान्यांनी, पर्यटकांनी अनुभवला व पुन्हा असाच कार्यक्रम घ्यावा असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सेविका स्नेहा खोत तसेच प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष मनोज मालवणकर, श्यामसुंदर मालवणकर, मंदार मयेकर व सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.















