खारेपाटण येथे रस्त्यावर बरेच दिवस बंद असलेले पथदिवे लावले.

शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर याचे सौजन्य रस्त्यावर लावले पथदिवे

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात मागील काही दिवसापासून बंद असलेले पथ दिवे स्थानिक ग्रामपंचायतीकडून लावले जात नसल्याचे निदर्शनास येताच उबाठा शिवसेना तालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावरील दिवे शिवसेना पक्षाच्या वतीने लावून सत्ताधाऱ्यांनी पसरवलेला अंधार दूर करून नागरिकांना प्रकाशमान
दिलासा दिला.

याबाबत शिवसेना तालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांनी सांगितले की,खारेपाटण ग्रामपंचायत पावसाळ्याचे दिवस असताना देखील रस्त्यावरील पथदिवे नागरिकांनी सांगून सुद्धा वेळेवर लावले जात नसल्याचे सांगितले. याबाबत ग्रामस्थानी माझ्याकडे ही कैफियत मांडल्या नंतर आमच्या पक्षाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद असलेले ३ पथदिवे तत्काळ लावण्यात आले.तर खारेपाटण कष्ट्येआळी या भागात देखील काही ठिकाणी बंद असलेले ४ पथदिवे बदलून नवीन लावण्यात आले. याबरोबरच खारेपाटण शिवाजीपेठ येथे देखील २ ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक गरजा सोयी सुविधा पुरविणे हे बंधनकारक असताना देखील सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील व्यक्तिगत आपसा आपसातील मतभेदांमुळे स्थानिक जनतेला अंधारात ठेवणे कितपत योग्य आहे ?असा सवाल देखील यावेळी महेश कोळसुलकर यांनी व्यक्त केला आहे.तर खारेपाटण शहरात एकूण ९ ठिकाणी पथदिवे लावल्याबद्दल नागरीकांच्या वतीने शिवसेना उपतालुका प्रमुख महेश कोळसुकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!