पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन! मात्र ईपीक पेरा नोंदीचा पत्ताच नाही.? योजनेत सहभाग कसा घेणार ?

प्रशासनाने त्रुटी सुधारायची आग्रही मागणी ! अन्यथा गेल्यावर्षीची पुनरावृत्ती

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकतेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे, आवाहन केले आहे. आणि शेवटची मुदत १० ऑगस्ट २६ आहे. वस्तुतः यासाठी आवश्यक भाताच्या पिकाची नोंद सन २०२६/२७ च्या सातबारावर होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीची प्रशासन नियुक्त सुविधा आज अखेर सुरू केलेली नाही. अथवा त्याचे ॲप/ सर्वर अद्याप सुरू झालेले नाही. किंवा कधी सुरू होणार ? याची तलाठी, महसूल, कृषी विभागाकडून माहिती मिळत नाही. यामध्ये गेल्या वर्षी २०२५/२६ मध्ये स्वतःच्या भात क्षेत्रात उभे राहून, ॲपवर सर्व माहिती- फोटो अपलोड केल्यानंतर, आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर, “आपले क्षेत्र चार- पाच किलोमीटर दूर आहे”. असा एरर येतो आणि पीक सातबारावर नोंद होत नाही.

२०२५/२६ ची इ पिक सातबारावर झाली नसल्याने, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना,सोसायटीला भात विक्री, बोनस इत्यादीपासून वंचित रहावे लागले आहे. याबाबत फोंडाघाट विकास सोसायटी- चेअरमन, ग्रामस्थ यांनी निवेदने, सोशल मीडिया,बातम्यांद्वारे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल विभाग, जमाबंदी आयुक्त ,भूमी अभिलेख यांचे लक्ष वेधले होते. मात्र चुकीचे नकाशे ॲपवर अपलोड केल्याने भूमी अभिलेख व जमाबंदी आयुक्त यांचा भोंगळ व बेपर्वाई चा कारभार त्यामुळे हा एरर त्रुटी येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर्षी तरी इ – पीक पेरा सातबारावर विना एरर व सुखकर नोंद व्हावा. यासाठी संबंधित विभागांनी लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी होत आहे.

error: Content is protected !!