कणकवली (प्रतिनिधी): समस्त चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६५० वी जयंती २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपन्न होणार आहे.या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने २९ जुलै २०२६ पासून (गुरुपौर्णिमा) रविदास महाराज जयंती पर्यंत २० फेब्रुवारी २०२७ पर्यंत *)संत शिरोमणी श्री गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.सामाजिक एकता व समता यांचा संदेश देशभरात देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.उद्या शनिवार ता.८ ऑगस्ट या अभियानांतर्गत कलश सिंधुदुर्गात येत असून सदर कलशाचे स्वागत कणकवली पटवर्धन चौक येथे सकाळी ठीक ९.३० वाजता होईल.त्यानंतर सकाळी ठीक १०.३० वाजता आपल्या संत रविदास भवन हुमरमळा ता.कुडाळ येथे सदर कलश ठेवण्यात येणार आहे.तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्षश्री.सुजित जाधव, जिल्हा सचिव श्री.चंद्रसेन पाताडे यांनी केले आहे.
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा स्मृती कलश उद्या ८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात












