कुणकेश्वर शिवतीर्थावर पुन्हा नागदर्शन

नागपंचमी नंतर दुसऱ्याच दिवशी भैरव मंदिरात दिसली नागीण

देवगड (प्रतिनिधी) : काल नागपंचमीच्या दिवशी नागाने कुणकेश्वर येथे दर्शन दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा एकदा सर्पदर्शनाची घटना घडली आहे. आज दुपारी सुमारे तीनच्या सुमारास कुणकेश्वर येथील भैरव मंदिराच्या सभा मंडपात नागीण आढळून आली. सदर घटना लक्षात येताच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत स्थानिक सर्पमित्र पराडकर यांना संपर्क केला. पराडकर यांनी घटनास्थळी येत नागीण सुरक्षितपणे पकडली व तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

विशेष म्हणजे सध्या भैरव मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे आणि याच कालावधीत अशी दुर्मिळ सर्पदर्शनाची घटना घडल्याने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आणि धार्मिक भावनांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!