सतिश रघुनाथ सावंत यांचे दातृत्व….!

अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून चिंदर केंद्रातील जि. प. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर. नं 1, कुंभारवाडी, शाळा चिंदर बाजार, जि. प. शाळा अपराजवाडी, शाळा पडेकाप, जि. प. शाळा सडेवाडी, शाळा भटवाडी, जि. प. शाळा पालकरवाडी, गावडेवाडी या शाळांना मुंबईस्थित बँक ऑफ इंडिया निवृत्त अधिकारी सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून आज वही, पेन, खोड रबर, छत्री असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेली तीन वर्षे अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्य वितरित होत असून आजचे शैक्षणिक साहित्य अरविंद बुवा पाताडे, शंकर पाताडे, चंद्रकांत पाताडे, रविंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आले.

यावेळी शिक्षक नंदकुमार जुंधळे, वैशाली चव्हाण, स्वाती पाटील, स्मिता जोशी, अरुण आडे, संजय जाधव, निशिगंधा वझे, शुभांगी खोत-लोकरे, मैना कारंडे, संतोष राठोड, नेहा कुबल, दिपा गोसावी आदी शिक्षक उपस्थित होते. दाते आणि मान्यवर यांचे बहुसंख्य शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी यांनी विशेष आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!