समाजाला भूषणावह अन् आनंददायी बाब – प्रज्ञा शिंदे
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या समाजात अनेक हिऱ्यांनी आपल्या कर्तुत्वांने समाजाचे नाव मोठे करताना, मागासलेपण दूर केले आहे. त्यातील एक-मनस्या फाले, हिने राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून धनगर समाजाचे आणि जय मल्हार मित्र मंडळाचे नाव मोठे केले आहे.तिच्या पुढील प्रवासास आम्हा सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! आणि मनस्या तिचे आई-वडील, आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन अशा शब्दात ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सर्व अबालवृद्ध, युवाई ने मनस्याचे औक्षण केले. भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. समाजाची ऊर्जा आणि आराध्य अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे, शिंदे कुटुंबातील बाळकृष्ण, शामू, विठ्ठल, राजू ,गणेश, सुरेश, सखाराम,जानू, संतोष, विजय, गजानन तसेच जंगले कुटुंबातील झिलू, विठ्ठल तसेच वाडीवरील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












