“सार्वजनिक रुग्णालये ही जनतेची सेवा केंद्र…” – डॉ. विद्याधर तायशेट्ये
खारेपाटण (प्रतिनिधी) : शासन संचलित सार्वजनिक रुग्णालये व दवाखाने हे सर्वसामान्य जनतेची सेवा केंद्रे असल्याने ती स्वच्छ व सुंदर असावीत, या भूमिकेतून ही मोहीम आयोजित करण्यात आली असल्याचे कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॅा. विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल व सविता आश्रम पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील परिसर स्वच्छ्ता मोहीम प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ्ता पूर्व मीटिंग मध्ये सांगितले.
यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष रोटे, ऍड. राजेंद्र रावराणे, सेक्रेटरी रोटे, प्रोफे. सुप्रिया नलावडे, खजिनदार रोटे, ऍड. गुरूनाथ पावसकर व सर्व रोटरी मेंबर्सनी हा उपक्रम राबवला जावा हे सर्वानुमते ठरवण्यात आले होते.
या अनुषंगाने डॅा. विद्याधर तायशेटे यांच्या मातोश्री कै. सुधा वसंत तायशेटे यांच्या जन्म दिन २६ जुलै याचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे राबविण्यात आली. तर या स्वच्छ्ता मोहिमेत जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रममधील बांधव व सेवा कार्यकर्त्यांकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे सुमारे दोन अडीच तास चाललेल्या या स्वच्छ्ता मोहिमेत रुग्णालयाच्या सभोवताली परिसराची स्वच्छता रोटरी क्लब सदस्य व सविता आश्रम बांधव आणि कार्यकर्ते यांचेकडून करण्यात आली.
या मोहिमेच्या संयोजनात उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी आणि डॉ. विद्याधर तायशेटे व जीवन आनंद संस्थेच्या संविताश्रमचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, स्वयंसेवक शैलेन्द्र कदम, संतोष नाईक, यांचेसह आशिकी राणे, महेश व मयुरी लोट, सचिन सावंत, विजय नाईक व बांधव राजेश सावंत, संदेश करवणकर, शेखर जोशी, सोनी फर्नांडिस, ज्युड भगीणी सुप्रिया, सुनिता कदम, सेजल, सरिता महादेवी पूर्वा यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेत रुग्णालय परिसरातील कचरा एकत्र गोळा करून इतरत्र न फेकता पिशव्यांमध्ये संचय करून नगर पंचायतकडे जमा केला.
उपजिल्हा रुग्णालयाचा सर्व परिसर स्वच्छ झाल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॅा. रेड्डी यांनी डॅा. विद्याधर तायशेटे, रोटरी क्लब कणकवली सेंट्रल, नगरपंचायत कणकवली व सविताश्रम संस्थेचे आभार मानले.













