तरंदळे कुंदेवाडी बसफेरी पूर्ववत सुरू करा

सरपंच सुशील कदम यांची आगार व्यवस्थापकांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : आज कणकवली आगार व्यवस्थापक यांना तरंदळे कुंदेवाडी बस फेरी पूर्ववत सुरू करण्याबाबद भेट देण्यात आली. सरपंच सुशिल कदम यांनी चर्चा करताना पुढील विषय मांडले. तरंदळे कुंदेवाडी बस सेवा कोरोना महामारीत बंद करण्यात आली होती. त्यानंतर भारमाण कमी असल्याचे कारण देऊन सदर फेरी पूर्णता रद्द करण्यात आल्याने नेहमी शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना व कामानिमित्त जाणाऱ्या लोकांना, जेष्ठ नागरिकांना ह्याचा महाभयंकर त्रास होतो आहे. कणकवली मध्ये ये-जा करताना बरेच समस्या उद्भवत व गैरसोय होत आहे. त्यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी सदरची कुंदेवाडी फेरी सुरू करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले. आगार व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या 8 ते 10 दिवसात ही सेवा चालु करण्याचे आश्वासन देण्यात आले.

ह्यावेळी सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे, संदेश सावंत, अशोक सावंत, राजाराम सावंत, सतीश हडकर, अभिजित तेली, अनिल सावंत, किरण सामंत, सुशिल परब, अमोल गावकर, नितेश गावकर, शांती घाडीगावकर, नरेश घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर, चंदन पाटील, रामचंद्र मुंबरकर, रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

error: Content is protected !!