उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांची तरंदळे सरपंच सुशील कदम यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या जयप्रकाश अनंत परब यांची भेट घेण्यात आली. ह्यावेळी सरपंच सुशिल कदम व ग्रामस्थ यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटी मध्ये गावच्या विकास कामाबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. ह्यावेळी तरंदळे सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, माजी उपसरपंच संदेश सावंत, अनिल सावंत, अभय सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!