कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात

कणकवली (प्रतिनिधी) : नगरसेविका मेघा सावंत यांच्या मागणीनुसार तसेच कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष समिर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून टेंबवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 66 रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे .तसेच टेंबवाडी रस्ता ते संतोष राणे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचे शुभारंभ ज्येष्ठ नागरिक मुंडले सर यांच्या हस्थे करण्यात आला .या वेळी नगराध्यक्ष समीर जी नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे तसेच या भागातील नगरसेविका मेघा सावंत नगरसेवक अभी मुसळे संतोष राणे महेश सावंत अभय राणे. विठ्ठल कांदळकर .अनिल राणे .संतोष सावंत पेडणेकर मॅडम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला.

नगराध्यक्ष आणी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून टेम्बवाडी आणी कांबळेगल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. विविध विकास कामे, रस्ते, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, गणपती साना धबधबा असो अशी विविध विकासकामे करून माझा प्रभागाला नवीन ओळख दिल्याबद्दल तसेच सर्व सुविधानी परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे या प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका मेघा सावंत यांनी आभार व्यक्त केले.. यावेळी व्यंकटेश सावंत. धनजय कसवणकर .सागर राणे संदेश आर्डेकर. औदुंबर राणे .रुपेश साळुंखे केतकर गुरुजी आत्माराम राणे .बंडू राणे . धनंजय चव्हाण . गोट्या पारगावकर .आदर्श राणे . अविशित राणे यश पालव . पाल. मकरंद राने आदी ग्रामस्थ आणि जमीन मालक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!