वैभववाडी (प्रतिनिधी) : साई शान ऍग्रो चे मालक अरविंद रघुनाथ पेडणेकर यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत शाळेला रोख अकरा हजार रुपयांची देणगी दिली. नुकतीच त्यांनी विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी या शाळेला भेट दिली. शालेय परिसर व व्यवस्थापन पाहून भारावून गेलेल्या अरविंद पेडणेकर यांनी आज शाळा समिती चेअरमन बाप्पी मांजरेकर यांच्याकडे शाळेच्या भौतिक गरजांसाठी रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये देऊन शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाबद्दल गौरवोद्गार काढले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतीकडे लक्ष देऊन आपले करिअर करता येते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी नाधवडे येथे सुरू केलेल्या गोशाळेची माहिती सूर्यकांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी नाधवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम ईस्वलकर, माजी उपसरपंच सूर्यकांत कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, संदीप कोळेकर, पंढरीनाथ सावंत, सुजाता कुडतडकर , शाळा समितीचे व्हाईस चेअरमन नाना बंड, वैभव कोकाटे, निकिता कांबळे, रेणुका वारीक, श्रीमती कोकरे, सारिका पेडणेकर, शेणवी, वैभव तानवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी देणगी स्वरुपात रोख रक्कम दिल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे यांनी अरविंद पेडणेकर यांचे आभार मानले.












