सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूल अजेय

बांदा (मंगल कामत) : तुळसुली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशालेतील 14 वर्षे वयोगट मुली व 17 वर्षे वयोगट मुली यांनी सुवर्णमयी कामगिरी करून विजेते पद मिळवले व सातारा येथे होणाऱ्या विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.

दोन्ही संघातील खेळाडूंनी चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. मार्गदर्शक शिक्षक महेश नाईक सर, लवू बांदेकर सर व मृणाल तोरस्कर मॅडम यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका जे. डी सावंत, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेचे कार्याध्यक्ष आ. डॉ.मिलिंद तोरसकर, सर्वं कार्यकारिणी सदस्य, समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरस्कर, सहसचिव नंदकुमार नाईक, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, माजी विद्यार्थी, मडुरा पंचक्रोशी पदाधिकारी, विकसित मडुरा ग्रुप सदस्य, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

17 वर्षे वयोगट मुली संघ मध्ये उर्वशी शेरलेकर, खुशी शेगडे, स्नेहा केरकर, सानिका गावडे, श्रेया गावडे, दृष्टी सातार्डेकर, नियती मोरजकर, चैत्रा नाईक, क्लेरिसा रोड्रिक्स, काजल माधव, अलिषा गावडे तर 14 वर्षे वयोगटातील मुलीमध्ये अवनी रेडकर सायली देऊलकर, संजीवनी नाईक, रीना शेळके, योगेश्वरी परब, गौतमी केणी, खुशी पडलोस्कर, क्लेन्सी रॉड्रिंक्स, ईश्वरी आंबेकर, अस्था वेंगुर्लेकर, आराध्या परब, सुविदा धुरी ह्या खेळाडू होत्या. सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

error: Content is protected !!