ज्ञानदीप विद्यालयात दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप….!

संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांचा स्तुत्य उपक्रम

आचरा (प्रतिनिधी) : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्ञानदीप विद्यालय वायंगणी येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविला.

यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू हडकर, मुख्याध्यापक श्री.टकले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करताना संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवाळी सणाचा आनंद लुटताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संस्थाध्यक्षांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक श्री.टकले, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू हडकर, श्री.जाधव, साै.हळदणकर तसेच उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन हळदणकर मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!