खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या कार्यालयीन कामकाजाला अधिक गती मिळावी आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, या उद्देशाने रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली यांनी नुकताच रोटरी क्लब ऑफ खारेपाटणला ब्रदर कंपनीचा प्रिंटर भेट म्हणून प्रदान केला.
रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना कार्यालयीन कामकाज महत्त्वाचे असते. या कामकाजा साठी आवश्यक असलेले प्रिंटरसारखे साधन उपलब्ध करून दिल्याने क्लबच्या कार्यात निश्चितच मदत होणार असल्याचे मत यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व रोट्रियन श्री संजय सानप यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब खारेपाटण चे अध्यक्ष रो. मंगेश ब्रह्मदंडे,सचिव रो.सुबोध देसाई, खजिनदार रो.शर्मिन काझी, रो. सारिका महिंद्रे, रो.लक्ष्मीकांत हरयाण, रो.प्रियेशा अमृते, रो. अजय गुरसाळे, रो.दयानंद कोकाटे आणि रो.संतोष राऊत आदी उपस्थित होते.
या उपयुक्त भेटीबद्दल रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लबच्या कार्याला या सहकार्यामुळे अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.











