दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!

नागेश्वर मित्रमंडळातर्फे ९ व १० नोव्हेंबरला स्वरगंध कार्यक्रम; नाना-नानी पार्क येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या उत्सवानिमित्त कणकवली-टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने दोन दिवसीय ‘स्वरगंध’ संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ९ नोव्हेंबर आणि मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता नाना-नानी पार्क, कणकवली-टेंबवाडी येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी स्वरगंधार कणकवली ग्रुप प्रस्तुत गायक दुर्गेश मिठबावकर यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी संगीत अलंकार संदीप पेंडुरकर व तेजस्विनी पेंडुरकर संचलित आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांच्या वतीने ‘दीपसंध्या’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या आनंदोत्सवात संगीताची सुरेल मेजवानी अनुभवण्याची संधी कणकवलीकरांना मिळणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. नागेश्वर मित्रमंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असते. ९ व १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष सुधाकर उर्फ बंडू राणे व अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

error: Content is protected !!