ठाकरे शिवसेनेच्या कलमठ विभागातर्फे आयोजन : १० रोजी दीपोत्सव
कणकवली (प्रतिनिधी) : दीपावलीनिमित्त ठाकरे शिवसेनेच्या कलमठ विभागातर्फे ८ ते १० नोव्हेंबर या कालावधीत गड-किल्ले बनवणे, दिवाळी फराळ स्पर्धांसह दीपोत्सव आयोजित केला आहे.
रविवार ८ रोजी गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे २हजार १ रु. १ हजार ५०१ रु. १ हजार१ रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ५०१ रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाºया स्पर्धकांनी साकारलेल्या गडकिल्ल्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची संकल्पना आणि गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व बालमनावर बिंबविणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.
मंगळवार १० रोजी सायंकाळी ४ वाजता कलमठ बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दिवाळी फराळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १ हजार ५०१ रु., १ हजार १ रु., ७०१ रु. व आकर्षक भेटवस्तू, उत्तेजनार्थ : ५०१ रु. व आकर्षक भेटवस्तू, सर्व सहभागी स्पर्धकांसाठी आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पारंपरिक फराळातील विविध खाद्यपदार्थांचे सादरीकरण करता येणार आहे. महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा पार पडल्यानंतर सायंकाळी ६ वा. गडकिल्ले बनविणे, दिवाळी फराळ स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल. त्यानंतर ७ वा. दीपोत्सव साजरा होणार आहे.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नितेश भोगले, धीरज मेस्त्री, राहुल कडुलकर, प्रसाद मठकर, निश्चय हुन्नरे यांच्याकडे संपर्क साधवा.












