सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव व किरण गुरव यांचे सौजन्य
अंतिम विजेता स्पर्धकाला १०००० रुपये तर उपविजेताला ५००१ रुपये व आकर्षक चषक
खारेपाटण (प्रतिनिधी) : नारळी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव व किरण गुरव यांच्या सौज्यन्याने व रॉयल ब्रदर्स खारेपाटण यांच्या नियोजनाखाली खारेपाटण एसटी बस स्थानक येथे शुक्रवार दि. २ ऑगस्ट, २०२५ रोजी भव्य खुल्या नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या अंतिम विजेता स्पर्धकाला सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव पुरस्कृत रोख रुपये १०,०००/- रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता स्पर्धकाला रोख रुपये ५००१/- व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर या स्पर्धेसाठी आयोजकांकडून ५ नारळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार असून स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाला २५०/- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
तरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी रॉयल ब्रदर्स खारेपाटणचे कार्यकर्ते तुषार कोळसुलकर – ८७९३३३८३६४, चिन्मय कोळसुलकर – ९३२२७११२४०, गणेश कारेकर – ८३२९०६९१७१, उदय जामसंडेकर – ९५११८८५०१२ यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.












