वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग,राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कर्करोग मोबाईल व्हॅन द्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग गर्भाशय कर्करोग, आदी तपासण्या करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय वैभववाडी यांच्याकडून करण्यात आले आहे.
9 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम












