वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार वाभवे वैभववाडी शहरात हर घर तिरंगा 2025 मोहीम मोहीम राबविण्यात येणार आहे. यानिमित्त 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा,तिरंगा राखी बनवणे,तिरंगाच्या भावनेचा गौरव करण्यासाठी भारतीय जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान, तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तिरंगा मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले असून या रॅली शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरपंचायत वाभवे वैभववाडीचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन












