श्रावणी सोमवारनिमित्त केंद्र शाळा भिरवंडे नं. १ च्या विद्यार्थ्यांची गोवर्धन गोशाळा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : श्रावणी सोमवारचे औचित्य साधून, केंद्र शाळा भिरवंडे नं. १ शाळेतील सर्व मुले व शिक्षक यांनी गोवर्धन गोशाळा – करंजे, तालुका – कणकवली येथे पावसाळी क्षेत्र भेट आयोजित केलेली होती.

या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन मुख्य हॉलमध्ये कृष्ण जन्मापासून ते कुरुक्षेत्रा पर्यंतची प्रसंगचित्रे पाहून मुले आनंदीत झाली. तसेच गाईच्या गोठ्यांना भेट देऊन विविध प्रकारच्या गाई पाहिल्या. मुलांनी छोट्या वासरांना स्पर्श करून आनंद घेतला. तसेच मुलांनी गार्डनमध्ये खेळण्यावर खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. स्वादिष्ट मिसळ पाव खाऊन निरोप घेतला.

सोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिश रोहिदास सावंत, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष मंगेश शां. सावंत, शा. व्य. स. सदस्य ॠषिकेश सावंत, रिक्षा मालक संदिप सावंत व आषिश सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!