वैभववाडी येथील गांगो मंदिरातील घंटा चोरीस

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील श्री. गांगो मंदिरातील घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना स्थानिकांच्या शनिवारी सकाळी निदर्शनास आली. मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाणेत तक्रार देण्यात आली नव्हती. तालुक्यातील मंदिराना चोरट्यांनी टार्गेट केले असून काही दिवसापूर्वीच उपळे येथील सिद्धेश्वर मंदिरातील घंटा चोरीस गेल्या होत्या. सांगूळवाडी रस्त्यावर वैभववाडी शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गांगो मंदिरातील घंटावर चोरट्यानी हात मारला आहे. या मंदिरातून दोन घंटा व एक टोप चोरट्यानी लंपास केला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. ग्रामस्थांनी या चोरीची पोलिसांना माहिती दिली मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. तालुक्यात गेल्या काही दिवसात उपळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दोन वेळा घंटा चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर कुसूर येथील मंदिरात घंटा चोरीस गेल्या आहेत. शिवाय यापूर्वी अनेक मंदिरांतून दानपेट्या ही फोडण्यात आल्या आहेत. मात्र या चोऱ्यांचा सुगाव लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

error: Content is protected !!