महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधणार भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

भाजपा जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संवाद सभेचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ते जिल्हाधिकारी संकुलाला भेट देणार असून जिल्ह्यातील नागरिकांची महसूल विषयक विविध निवेदने स्वीकरणार आहेत. ते दुपारी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

१३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत जिल्ह्यातील नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद तर त्यानंतर दुपारी १ ते २.३० या वेळेत जिल्हा महसूल अधिकारी आढावा बैठक संपन्न होणार आहे. दुपारी ३ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांशी संघटनात्मक कामासंदर्भात संवाद साधणार आहेत. तसेच नव्याने लागू होत असलेल्या तुकडा बंदी विधेयकातील अपेक्षित सुधारणा संदर्भात नगरपालिका, नगरपंचायती लगतच्या गावातील प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी सर्व प्रतिनिधींनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे.

तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते या सर्वानी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!